गुरुपरंपरेचे अभंग | Guru Parampara Che Abhang | Haripath

Haripath,
हरिपाठ,
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ,
ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण हरिपाठ,
संपूर्ण हरिपाठ,
गुरुपरंपरेचे अभंग
Sampoorna Haripath,
sampoorn haripath,
Guru Parampareche Abhang,
Guru Parampara Che Abhang,

Guru Parampareche Abhang

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

श्री ज्ञानेश्वर महाराज प्रसन्न॥

भजन : रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी

सुंदर-ते-ध्यान उभे-विटेवरी कर-कटावरी ठेवोनिया ॥१॥
तुळशीहार गळा कांसे पीतांबर आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥
मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित ॥३॥
तुका-म्हणे माझे-हेचि सर्व-सुख पाहीन श्रीमुख-आवडीने ॥४॥

एक

देवाचिये-द्वारीं उभा-क्षणभरी तेणें-मुक्ति चारी-साधियेल्या ॥१॥
हरि-मुखें-म्हणा-हरि-मुखें-म्हणा पुण्याची-गणना-कोण्-करी ॥२॥
असोनि-संसारीं जिव्हे-वेग करी वेद-शास्त्र उभारी-बाह्या-सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥

दोन

चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव समा  वायां तू दुर्गम घाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे ॥४॥

तीन

त्रिगुण-असार निर्गुण-हें-सार सारा-सार विचार-हरिपाठ ॥१॥
सगुण-निर्गुण गुणाचें-अगुण हरिवीण-मन व्यर्थ-जाय ॥२॥
अव्यक्त-निराकार नाहीं ज्या-आकार जेथुनि चरा-चर हरीसी-भजें ॥३॥
ज्ञानदेवा-ध्यानीं रामकृष्ण-मनीं अनंत-जन्मोनि पुण्य-होय ॥४॥

चार

भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥
सायासें करिसी प्रपंच दिननिशीं हरिसी भजसी कोण्या गुणें ॥३॥
ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥

पाच

योगयाग विधि येणें नव्हे सिद्धी वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावेंविण देव कळे नि:संदेह गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेंवीण-दैवत दिधल्याविण-प्राप्त गुजेंविण-हित कोण-सांगे ॥३॥
ज्ञानदेव-सांगे दृष्टांताची-मात साधूचे-संगती-तरणोपाय ॥४॥

सहा

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला ठायींच मुराला अनुभव ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योति ठायींच समाप्ति झाली जैसी॥२॥
मोक्षरेखे आला भाग्यें विनटला साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वीं ॥४॥

सात

पर्वताप्रमाणे पातक करणें वज्रलेप होणें अभक्तांसी ॥१॥
नाहीं ज्यांसी भक्ति तो पतित अभक्त हरिसी भजसी दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ त्यां कैसेनि गोपाळ पावे हरि ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥

आठ

संतांचे संगतीं मनोमार्ग गति आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥
एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचें बंधन बांघिजे  ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली योगियां साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥


विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥
उपजोनी करंटा नेणें अद्वैत वाटा रामकृष्णीं पैठा कैसेनि होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥
भजन : रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी

दहा

त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥
नामासी विन्मुख तो नर पापिया हरिवीण धांवया नपवे कोणी ॥२॥
पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥

अकरा

हरि उच्चारणीं अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥
तृण अग्निमेळें समरस झालें तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥
हरि उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूतबाधा भेणे तेथे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

बारा

तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धि वायांचि उपाधि करिसी जनां ॥१॥
भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥
पारियाचा रवा घेतां भूमिवरी यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥

तेरा

समाधि हरिची सम सुखेंवीण साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥
बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें एका केशीराजें सकळ सिद्धि ॥२॥
ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि जव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥
ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥

चौदा

नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी कळीकाळ त्यासी पाहे दृष्टी ॥१॥
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढें ॥२॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥

पंधरा

एक नाम हरि द्वैतनाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥
समबुद्धि-घेतां समान-श्रीहरि शम-दमांवरी हरि-झाला ॥२॥
सर्वांघटीं राम देहांदेहीं एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥
ज्ञानदेवा-चित्तीं हरिपाठ-नेमा मागिलिया जन्मा-मुक्त-झालों ॥४॥

सोळा

हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी ॥२॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले प्रपंची निमाले साधुसंगे ॥३॥
ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणें दशदिशा आत्माराम ॥४॥

सतरा

हरिपाठ कीर्ती मुखें जरी गाय पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥२॥
मातृपितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें निवृत्तीनें दिले माझ्या हातीं ॥४॥

अठरा

हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥
तया नरा लाधलें वैकुंठ जोडलें सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥
मनोमार्गें गेला तो तेथे मुकला हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥४॥
भजन : जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई

एकोणवीस

नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची ॥१॥
अनंत जन्मांचे तप एक नाम सर्वमार्ग सुगम हरिपाठ ॥२॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥
ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥

वीस

वेदशास्त्रप्रमाण श्रुतिचे वचन एक नारायण सार जप ॥१॥
जप तप कर्म हरिविण धर्म वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४॥

॥ एकवीस

काळ वेळ नाम उच्चारितां नाही दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण जडजीवां तारण हरि एक ॥२॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची उपमा त्या दैवाची कोण वानी ॥३॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥

बावीस

नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥
नारायण हरि नारायण हरि भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥
हरिविण जन्म तो नरकचि पैं जाणा यमाचा पाहुणा प्राणि होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनि वाड नाम आहे ॥४॥

तेवीस

सात पांच तीन दशकांचा मेळा एक तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥
तैसें नव्हे नाम सर्व मार्गा वरीष्ठ येथें कांहीं कष्ट लगती ॥२॥
अजपा-जपणें-उलट-प्राणाचा तेथेंहि-मनाचा-निर्धारू-असे ॥३॥
ज्ञानदेवा-जिणें-नामेंविण-व्यर्थ रामकृष्णीं-पंथ-क्रमियेला ॥४॥

चोवीस

जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥
सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥
जात वित्त गोत कुळ शीळ मात भजे कां त्वरीत भावनायुक्त ॥॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं तेणे वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥

पंचवीस

जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं हरिउच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥
नारायण हरि उच्चार नामाचा तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
तेथील-प्रमाण-नेणवें-वेदांसी तें-जीवजंतूंसी-केंवी-कळे ॥३॥
ज्ञानदेवा-फळ-नारायण-पाठ सर्वत्र-वैकुंठ-केलें-असे ॥४॥

सव्वीस

एक तत्व नाम दृढ धरीं मना हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥
तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधीं ॥२॥
नामापरतें-तत्त्व-नाहीं-रे-अन्यथा वायां-आणिका-पंथा-जासी-झणी ॥३॥
ज्ञानदेवा-मौन-जप-माळ-अंतरी धरोनी-श्रीहरि-जपे-सदां ॥४॥

सत्तावीस

सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार वायां येरझार हरिवीण ॥२॥
नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्णनामी संकल्प धरुनि राहें ॥३॥
निजवृत्ति काढी सर्व माया तोडी इंद्रियांसवडी लपो नको ॥४॥
तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥

अठ्ठावीस

नामसंकीर्तन साधन पैं सोपें जळतील पापें जन्मांतरे ॥१॥
लगती सायास जावें वनांतरा सुखें येतो घरा नारायण ॥२॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा ॥३॥
रामकृष्णहरि विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥४॥
यावीण आणीक असतां साधन वाहातसें आण विठोबाची ॥५॥
तूका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि शहाणा तो धणी घेतो येथें ॥६॥

एकोणतीस

देवाचिये-द्वारीं-उभा-क्षणभरीं तेणें-मुक्ति-चारी-साधियेल्या ॥१॥
हरि-मुखें-म्हणा-हरि-मुखें-म्हणा पुण्याची-गणना-कोण-करी ॥२॥
असोनि-संसारीं-जिव्हे-वेगु-करी वेदशास्त्र-उभारी-बाह्या-सदा ॥३॥
ज्ञानदेव-म्हणे-व्यासाचिया-खुणा द्वारकेचा-राणा-पांडवां-घरी ॥४॥

भजन : ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम


गुरुपरंपरेचे अभंग

एक

सत्य गुरुराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही ।। ।।
सापडविले वाटे जाता गंगास्नाना मस्तकी तो जाणा ठेवीला कर ।। ।।
भोजना मागती तूप पावशेर पडीला विसर स्वप्नामाजी ।। ।।
काय कळे उपजला अंतराय म्हणोंनिया काय त्वरा झाली ।। ।।
राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेची ।। ।।
बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी ।। ।।
माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे ।। ।।

दोन

माझीये मनीचा जाणूनिया भाव तो करी उपाव गुरुरावो ।। ।।
आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेणे नोहे गुंफा कोठे काही ।। ।।
जातीपुढे एक उतरले पार हा भवसागर साधुसंत ।। ।।
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी उतार सांगडी तापे पेठे ।। ।।
तुका म्हणे संती दावियेला तारू कृपेचा सागरू पांडुरंग ।। ।।

तीन

घालूनिया भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबाशी ।। ।।
लाऊनिया हात कुरुवाळीला माथा सांगितले चिंता करावी ।। ।।
कटी कर सम चरण साजिरे राहिला भिवरे तिरी उभा ।। ।।
खुंटले सायास आणिक या जीवा धरिले केशवा पाय तुझे।।४।।
तुज वाटे आता ते करी अनंता तुका म्हणे संता लाज माझी ।।५।।

चार

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणचि देव होय गुरु ।। ।।
पढिये देहभाव पुरवी वासना अंती ते आपणापासी न्यावे ।। ।।
मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया ।। ।।
योगक्षेम त्यांचा जाणे जडभारी वाट दावी कर धरोनिया ।।४।।
तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारूणी ।।५।।

पाच

आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहजस्थिति ।। ।।
तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली गहिणींनाथा ।। ।।
वैराग्ये तापला सप्रेमे निमाला ठेंवा जो लाधला शांती सुख ।। ।।
निर्द्वंद्व निसंक विचारता मही सुखानंद र्हदयि स्थिरावला ।। ।।
विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख येउनि सम्यक अनन्यता ।। ।।
निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे ।। ।।

सहा

आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। ।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिणीप्रति ।। ।।
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले ।। ।।

सात

अवघेचि त्र्येलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले ।। ।।
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन ।। ।।
एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे ।। ।।

आठ

अवघाचि-संसार सुखाचा-करीन आनंदे-भरीन तिन्ही-लोक ।।१।।
जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया ।।२।।
सर्व सुकृताचे फळ नि लाहीन क्षेम मी देईन पांडुरंग ।।३।।
बाप रखुमादेवीवरु विट्ठलाची भेटी आपुल्या सेवेसाठी करुनि ठेला ।।४।।

विनंतीचे अभंग

एक

कृपाळू सज्जन तुम्ही संतजन हेचि कृपादान तुमचे मज ।।१।।
आठवण-तुम्ही द्यावी-पांडुरंगा कीव-माझी सांगा-काकुलती ।।२।।
अनाथ अपराधी पतीत आगळा परी पायावेगळा नका करू ।।३।।
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिणा ।।४।।

दोन

बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे ।। ।।
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ।। ।।
नाही विचारला अधिकार म्या आपुला ।। ।।
तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा ।। ।।

तीन

झाले समाधान तुमचे देखिले चरण ।। ।।
आता ऊठावेसे मना येत नाही नारायणा ।। ।।
सुरवाडीकपणे येथे सापडले केणे ।। ।।
तुका म्हणे भोग l गेला निवारला लाग ।। ।।

चार

करुणी आरती चक्रपाणी ओवाळीती ।। ।।
आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस ।। ।।
पहा सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा ।। ।।
तुका वाहे टाळी उभा सन्निध जवळी ।। ।।

पाच

प्रेम सप्रेम आरती गोविंदाते ओवाळीती ।। ।।
धन्य धन्य ते लोचन नित्य करिती अवलोकन ।। ।।
बाळा पौढा आणि मुग्धा ओवाळिती परमानंदा ।। ।।
नामा म्हणे केशवाते देखोनि राहिलो तटस्थे ।। ।।
प्रार्थना

श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा
जगव्यापका जनार्दना, आनंदघना अविनाशा || ||
सकल देवाधिदेवा, कृपाळुवा जी केशवा
महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा || ||
चक्रधरा विश्वम्भरा, गरुडध्वजा करुणाकरा
सहस्त्रपादा सहस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना || ||
कमलनयना कमलापती, कामिनीमोहना मदनमूर्ती
भवतारका धरी त्या क्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा || ||
अगा ये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना
वासुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा || ||
तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी
हेची करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे || ||

।। जय हरी ।।

|| श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा ||

श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ॥१॥

राजयाची कांता काय भीक मागे । मनाचियां जोगे सिद्धी पावे ॥२॥

कल्पतरु तळवटीं जो कोणी बैसला । काय उणे त्याला सांगिजो जी ॥३॥

ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों । आतां उद्धरिलों गुरुकृपे ॥४॥

|| मोगरा फुलला ||

मोगरा फुलला मोगरा फुलला ।

फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥

इवलेंसे रोप लावियलें द्वारी ।

त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥

मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।

बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥



मित्रांनो जर तुम्हाला वरील हरिपाठ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणे करून इतर लोक पण याचा अभ्यास करू शकतील.

तुम्हाला वाटत असेल कीकाही अजून अभंग मी तुमच्यासाठी उपलब्ध करून द्यावे तर अभंगाचे नाव कंमेंट करायला विसरू नका

।। धन्यवाद  ।।



haripath, haripath marathi, haripath lyrics, haripath pdf, sampurna haripath, haripath haripath, haripath marathi pdf, baba maharaj satarkar haripath, haripath mp3 download,marathi haripath, haripath marathi audio,

14 टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. भाऊ आरत्या तुम्हाला दुसर्या पोस्ट मध्ये मिळतील.
      त्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.

      https://read-this-information.blogspot.com/2021/09/marathi-aarti-sangrah.html

      हटवा
  2. यात श्री गुरू सारीखा असता पाठिराखा व मोगरा फुलला हे दोन अभंग टाका

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. जय हरी,
      ब्लॉग वाचल्याबद्दल मनापासून आभार 🙏
      आपण सांगितलेले अभंग मी ब्लॉग मध्ये प्रार्थनेच्या खाली टाकले आहेत.
      आपणास जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या वारकऱ्यांना नक्की शेअर करा.
      आणि असेच प्रेम व आशीर्वाद असुद्या.

      हटवा
टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने