मराठी आरती संग्रह

मराठी आरती संग्रह

मराठी आरती संग्रह

श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ताफळाची |
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती जय देव जय देव || धृ ||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा | चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरेजडीत मुकूट शोभती बरा | रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || जय || २ ||
लंबोदर पितांबर फणीवर बंधना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना | संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना |
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती || ३ ||

श्री गणपतीची आरती (हिंदी)

शेंदूर लाल चढायो अच्छा गज मुखको | दोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको |
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको | महिमा काहे न जाय लागत हुं पदको || १ ||
जय जय जी गणराज विद्यासुखदाता | धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता || धृ ||
अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी | विघ्नविनाशक मंगल मुरत अधिकारी |
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबी तेरी | गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी || जय || २ ||
भावभगतसे कोई शरणागत आवे | संतत संपत सबही भरपूर पावे |
ऐसे तुम महाराज मोको अति भावे | गोसावीवंदन निशिदिन गुण गावे |
जय जय जी गणराज विद्यासुखदाता || धन्य || ३ ||

श्री शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा | वीषे कंठी काळा त्रिनेत्री ज्वाळा |
लावण्यसुंदर मस्तकी बाळा | तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा || १ ||
जय देव जय देव जय श्रीशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा || धृ ||
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा | अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा |
विभूतीचे उधळण शितिकंठ निळा | ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा | जय देव || २ ||
देवी दैत्यी सागर मंथन पै केले | त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले |
तें त्वां असुरपणे प्राशन केलें | नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले | जय || ३ ||
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी | पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी |
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी | रघुकुळटिळक रामदासाअंतरी || जय देव || ४ ||

श्री देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी | अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी |
वारी वारी जन्ममरणाते वारी | हरी पडलो आता संकट निवारी || १ ||
जय देवी जय देवी महिषसूरमथिनी | सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी || धृ ||
त्रिभुवन भुवनी पाहता तुजऐसी नाही | चारी श्रमले परंतु न बोलवे काही |
साही विवाद करिता पडिले प्रवाही | तें तू भक्तालागी पावसी लवलाही || जय || २ ||
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा | क्लेशापासुनि सोडावि तोडी भवपाषा |
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा | नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा |
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी | सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी || ३ ||

श्री दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा | त्रिगुणी अवतार त्रिलोक्यराणा |
नेति नेति शब्द नये अनुमाना | सुरवरमुनिजन योगी समाधी न ये ध्याना || १ ||
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव || धृ ||
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त | अभाग्यासी कैची कळेल हे मात |
पराही परतली तेथे कैचा हा हेत | जन्ममरणाचा पुरलासे अंत || जय || २ ||
दत्त येउनिया उभा ठाकला भावे सांष्टागेसी प्रणिपात केला |
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला | जन्ममरणाचा फेरा चुकविला || जय || ३ ||
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान | हारपले मन झाले उन्मन |
मी तू झाली बोळवण | एका जनार्दनी श्रीदत्तध्यान || जय देव || ४ ||

श्री विठोबाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा |
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा || १ ||
जय देव जय देव जय पांडुरंगा || रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय देव || धृ ||
तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी | कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी |
देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढे उभे राहती || जय || २ ||
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा | सुवर्णाची कमळे वनमाळा गळा |
राई रखुमाई राणीया सकळा | ओवाळिती राजा विठोबा सावळा || जय || ३ ||
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती | चंद्रभागेमाजी सोडुनिया देती |
दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णावा किती || जय || ४ ||
आषाढी कार्तिकी भक्तजन येती | चंद्रभागेमध्ये स्नाने जें करिती |
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती | केशवासी नामदेव भावे ओवाळिती || जय देव जय देव जय || ५ ||

येई हो विठ्ठले आरती

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर . . .
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।
ठेवुनी वाट मी पाहें ।।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे . . .
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।
हो माझा मायबाप ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। १ ।।

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि . . .
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।
हो माझा कैवारी आला ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। २ ।।

विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा . . . 
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।
हो जीवे भावें ओवाळी ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ३ ।।

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
कृपादृष्टी पाहें . . .
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।
हो माझ्या पंढरीराया ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ४ ।।

श्री विष्णूची आरती

आवडी गंगाजळे देवा न्हाणीले | भक्तीचे भूषण प्रेमासुगंध अर्पिले | अहं हा धूप जाळू श्रीहरीपुढे |
जंव जंव धूप जळे | तंव तंव देवा आवडे | रमावल्लमदासे अहं धूप जाळिला |
एकारतीचा मग प्रारंभ केला | सोहं हा दीप ओवाळू गोविंदा | समाधी लागली पाहतां मुखारविंदा |
हरीख हरीख हातो मुख पाहतां | चाकाटल्या ह्या नारी सर्वही अवस्था | सदभवालागी बहु हा देव भुकेला |
रमावल्लभदासे नैवेद्य अर्पिला | फल तांबूल दक्षिणा अर्पीली | तयाउपरी नीरांजने मांडिली ||
आरती आरती करू गोपाळा | मी तू पण सांडोनी वेळोवेळा || धृ ||
पंचप्राण पंचज्योती आरती उजळिली | दृश्य हे लोपलें तथा प्रकाशांतळी |
आरतीप्रकाशे चंद्र सूर्य लोपलें | सुरवर सकळीक तटस्थ ठेले |
देवभक्तपण न दिसे कांही | ऐशापरी दास रमावल्लभ पायीं || आरती ||

नवरात्राची आरती

आश्विनशुध्दपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो | प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो |
मूलमंत्रजप करुनी भोवते रक्षक ठेवुनी हो | ब्रम्हा विष्णू आईचे पूजन करिती हो || १ ||
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो | उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो | सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो |
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो | उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो | उदो ||
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो | मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो |
कंठीची पदके कांसे पितांबर पिवळा हो | अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो | उदो || ३ ||
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो | उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो |
पूर्ण कृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी हो | भक्तांच्या माउली सुर तें येती लोटांगणी हो | उदो || ४ ||
पंचमीचे दिवशी व्रत तें उपांगललिता हो | अर्ध्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो |
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो | आनंदे प्रेम तें आले सदभावे क्रीडता हो | उदो || ५ ||
षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो | घेउनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो |
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो | जोगवा मांगता प्रसन्न झाली भक्तकुळा हो | उदो || ६ ||
सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो | तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो |
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो | भक्त संकटी पडतां झेलुनी घेसी वरचेवरी हो | उदो || ७ ||
अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो | सह्याद्रीपर्वती राहिली उभी जगज्जननी हो |
मन माझे मोहिले शरण आलो तुजलागुनी हो | स्तनपान देऊनी सुखी केलें अंत:करणी हो | उदो || ८ ||
नवमीचे दिवशी नवदिवसाचे पारणे हो | सप्तशतीजप होमहवने सदभक्तीकरुनी हो |
षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो | आचार्य ब्राम्हणा तृप्त केलें कृपेकरुनी हो | उदो || ९ ||
दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लघनी हो | सिंहारूढ करी दारूण शस्त्रे अंबे त्वां घेउनी हो |
शुंभनिशुभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो | विप्रा रामदासा आश्रम दिधला तो चरणी हो |
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो || १० ||

मारुतीची आरती


सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ||
कडाडिले ब्रम्हांड धाक त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी || १ ||
जय देव जय देव जय श्रीहनुमंता | तुमचेनी प्रसादे न भी कृतांता || धृ ||
दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द | थरथरला धरणीधर मानिला खेद |
कडकडिले पर्वत उद्दगण उच्छेद | रामी रामदासा शक्तीचा शोध || जय || २ ||

श्री कृष्णाची आरती

ओवाळू आरती मदनगोपाळा | श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा || धृ ||
चरणकमल ज्याचे अति सुकुमार | ध्वजवज्रांकृश ब्रीदाचे तोडर ओवाळू || १ ||
नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान | हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन | ओवाळू || २ ||
मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी | वेधले मानस हारपली दृष्टी | ओवाळू || ३ ||
जडित मुगुट ज्याचा देदिप्यमान | तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन | ओवाळू || ३ ||
एका जनार्दनी देखियले रूप | रूप पाहतां जाहले अवघे तद्रूप | ओवाळू || ५ ||

श्री ज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत || मनु वेधला माझा || आरती || धृ ||
लोपलें ज्ञान जगी | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग | नाम ठेविले ज्ञानी || १ ||
कनकाचे ताट करी | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबर हो || साम गायन करी || २ ||
प्रकट गुह्य बोले | विश्र्व ब्रम्हाची केलें | रामजनार्दनी | पायी मस्तक ठेविले | आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||

श्री एकनाथाची आरती

आरती एकनाथा | महाराजा समर्था | त्रिभुवनी तूंचि थोर | जगदगुरू जगन्नाथा || धृ ||
एकनाथ नाम सार | वेदशास्त्रांचे गूज | संसारदु:ख नाम | महामंत्राचे बीज | आरती || १ ||
एकनाथ नाम घेतां | सुख वाटले चित्ता | अनंत गोपाळदासा | धणी न पुरे गातां | आरती एकनाथा | महाराजा समर्था || २ ||

श्री तुकारामाची आरती 

आरती तुकारामा | स्वामी सदगुरूधामा | सच्चिदानंदमूर्ती | पाय दाखवी आम्हा || आरती || धृ ||
राघवे सागरांत | पाषाण तारिले | तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकी रक्षिले || आरती || १ ||
तुकिता तुलनेसी | ब्रम्ह तुकासि आलें | म्हणुनी रामेश्वरे | चरणी मस्तक ठेविले || आरती तुकारामा || २ ||

श्री रामदासाची आरती

आरती रामदासा | भक्त विरक्त ईशा | उगवला ज्ञानसूर्य || उजळोनी प्रकाशा || धृ ||
साक्षात शंकराचा | अवतार मारुती | कलिमाजी तेचि झाली | रामदासाची मूर्ती || १ ||
वीसही दशकांचा | दासबोध ग्रंथ केला | जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले || २ ||
ब्रम्हचर्य व्रत ज्याचे | रामरूप सृष्टी पाहे | कल्याण तिही लोकी | समर्थ सद्गुरुपाय || ३ || आरती रामदासा || 

प्रार्थना

घालीन लोटांगण वंदीन चरण | डोळ्यांनी पाहीन रूप तुझें ||
प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन | भावें ओवाळीन म्हणे नामा ||
त्वमेव माता च पिता त्वमेव | त्वमेव बंधुश्‍च सखा त्वमेव ||
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव | त्वमेव सर्वं मम देवदेव ||
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा | बुद्धात्मना व प्रकृतिस्वभावअत्‌ ||
करोमि यद्‌त्सकलं परस्मै | नारायणायेति समर्पयामि ||
अच्युतं केशवं रामनारायणं | कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्‌ ||
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं | जानकीनायकं रामचंद्रं भजे ||
हरे राम हरे राम राम राम हरे हरे | हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ||


सदा सर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गूणवंता अनंता
रघूनायका मागणे हेचि आतां ||||

कैलास राणा शिव चंद्रमौळी
फणींद्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्य सिंधू भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||||

मोरया मोरया मी बाळ तान्हें
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा ब तू घाल पोटी ||||

ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे 
त्या त्या ठीकांणी निजरुप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी
तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ||||

अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र
तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र
तया आठविता महापुण्यराशी
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ||||

अष्टविनायक नमन

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम |
बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम |
लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम |
ग्रामो रांजण संस्थीतम गणपति |
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान ||

मंत्रपुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् |
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ||
 ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने |
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे |
स मस कामान् काम कामाय मह्यं |
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय |
महाराजाय नम: |
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं |
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं |
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं |
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं |
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति |
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो मरूतस्यावसन् गृहे |
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ||

एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदंती प्रचोदयात् ||

|| मंत्रपुष्पांजली समर्पयामि ||
|| गणपतिबाप्पा मोरया ||
|| मंगलमूर्ती मोरया ||
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने